आचवला, दरेवाडी(बालाजीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जंतनाशक मोहीम
देवणी:(प्रतिनिधी विक्रम गायकवाड) जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये एक व आठ मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने देवणी तालुक्यातील ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना मध्ये समाविष्ट असणारे मौजे आचवला व दरेवाडी(बालाजीवाडी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दि 01/03/21 रोजी covid-19 नियमांचे पालन करून जंतनाशक गोळयांचे वाटप करण्यात आले. १ ते ६ वयोगटातील सर्व मुले व ६ ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी दिली जात आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख, धोत्रे, मन्सुरे, तालुका समन्वयक सागर तापडिया, आशा कार्यकर्ती ई उपस्थित होते.

0 Comments