औराद शहाजानी येथे किराणा दुकानाला रात्री उशिरा आग लागून लाखो रुपयाचे नुकसान
(मारुती लोहार)
औराद शहाजनी: निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील एका किराणा दुकानाला आज रात्री दहा वाजता अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे तालुक्यातील औराद शहाजनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बोंडगे संतोष रामराव यांच्या किराणा दुकानाला रात्री दहा वाजता शॉर्टसर्किटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली व दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले यात पंचवीस ते तीस लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मुख्य चौका वरील हे मोठे दुकान असल्याने मोठी हानी झाली आहे. आग एवढी प्रचंड होती की आग लागल्यानंतर जवळील अनेक दुकानातील सामान रिकामे करण्यात आले आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत नागरिकांनी चहूबाजूने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत दुकानातील लाखो रुपयाचे किराणा साहित्य पूर्णपणे जळाले आहे.

0 Comments