नळेगाव मध्ये सोशल डिस्टन्स चा फज्जा
नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे ) दि. 19 - जिल्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे सोशल डिस्टन्स व सुरक्षा उपाय योजनांचा फज्जा उडत असून ना सोशल डिस्टन्स ना तोंडाला मास्क या मुळे प्रशासनाने व पोलिसांनी याबाबत कारवाई करणे गरजेचे बनले आहे. भाजी व फळ विक्रेते तर मुख्य रस्त्यावरच दुकाने मांडून विक्री सुरू केली आहे त्यामुळे बाजारपेठे मध्ये कोणाच्याही तोंडास मास्क ना सोशल डिस्टन्स दिसून येत आहे. तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असतानाही मास्क वापरला जात नाही. बाजारपेठे मध्ये विनाकारण फिरणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत असून कोणाच्या तोंडाला मास्क दिसत नाही. नळेगावकरांना कोरोनाचा धोका कळला असतानाही नागरिक बिंदास्त फिरताना दिसत आहेत. सुरक्षित सोशल डिस्टन्स, मास्क न वापरणे हा निष्काळजीपणा नळेगावकरांच्या अंगलट येऊ शकतो. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने असे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने व प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

0 Comments