संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेसाठी तात्काळ बैठक घेऊन अर्ज निकाली काढावे- गणराज्य संघाची मागणी
वसीम मुजावर
निलंगा: संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेसाठी तात्काळ बैठक घेऊन अर्ज निकाली काढावे असे आशेचे निवेदन तहसीलदार गणेश जाधव यांना गणराज्य संघाच्या वतीने देण्यात आले. संजय गांधी निराधार कमिटी ची स्थापना झालेली आहे गेली पाच ते सहा महिन्यापासून संजय गांधी योजना श्रावणबाळ विधवा दिव्यांग यांना अनुदान मंजुरीसाठी सर्व कागदपत्रासह आपल्या कार्यालयात अर्ज दाखल केलेले आहेत ते अर्ज पाच ते सहा महिन्यापासून मंजुरीविना प्रलंबित आहेत लाभार्थी बैठकीकडे डोळे लावून प्रतिक्षा करीत आहेत कमिटीची बैठक घेऊन अर्ज मंजूर करावेत कारण आपण दिलेल्या 21 हजार रुपये उत्पन्नाची कालमर्यादा 31 मार्च 2021 आहे मार्चअखेर उत्पन्नाचे प्रमाणपत्र मुदत संपणार असल्यामुळे मुदतीच्या आत कमिटीची बैठक घेऊन अर्ज मंजूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा उत्पन्नाची कालमर्यादा संपून अर्ज नामंजूर होण्याची लाभार्थ्यांना भीती आहे परत नवीन कागदपत्र जुळवाजुळव करून फाईल दाखल करणे जिकिरीचे आहे तरी तहसीलदार साहेबांनी संजय गांधी निराधार कमिटीचे तात्काळ बैठक घेऊन आज निकाली काढावेत अन्यथा गणराज्य संघाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे आवाहन करण्यात आले. निवेदनावर गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे भीमशक्ती निलंगा तालुका अध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी, प्रसाद कांबळे, कैलास कांबळे, सतिश गायकवाड, अमोल गाजरे, तुकाराम वाघमारे, प्रसाद कांबळे ओमप्रकाश मठपती, सतिश गायकवाड माधव सूर्यवंशी सह राज्य संघाच्या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.

0 Comments