Latest News

6/recent/ticker-posts

विजय संतान यांची SGFI च्या महासचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

विजय संतान यांची SGFI च्या महासचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार


(के वाय पटवेकर)

पुणे: स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पुण्याचे क्रीडा उपसंचालक विजय बापूराव संतान यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. संतान यांनी यापूर्वी नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. 25 सदस्य कार्यकारिणीत देशभरातील दिग्गज माजी खेळाडू, अधिकारी, पदाधिकारी व क्रीडा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. माजी ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशीलकुमार हे सदर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. विजय संतान यांच्या निवडीबद्दल बागुल, सोलंकर, लकडे, स्वामी, हरनाळे, टेभरे, भंडारे, आयेचकर, नाना तलवाडे, शिल्पा चाबुकस्वार, अंजली वाघ आदीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments