Latest News

6/recent/ticker-posts

प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता अभियान कार्यक्रम

प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता अभियान कार्यक्रम


लातूर:(जिमाका)दि.16 - जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय, लातूर व कोल्हापूर येथील स्वच्छता दूत अदित्य लातूरकर,आकाश पतंगे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. या स्वच्छता अभियान कार्यक्रमास जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी डॉ.भा.ना.संगमवार यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्सर्फुतपणे सहभाग नोंदविला. हा उपक्रम या पुढे प्रत्येक आठवडयात एक दिवस राबविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी बी.एन. संगमवार यांनी सूचित केले आहे.

Post a Comment

0 Comments