देवणी तहसील समोर तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात उपोषण
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) देवणी तहसील समोर तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव भोपणीकर, दिलीप पाटील नागराळकर, देवणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अॅड अजित बेळकोणे, जिल्हा उपाध्यक्ष लातूर मालबा घोणसे तळेगावकर , यांनी तीन काळ्या कृषि कायद्याविरोधात केंद्र शासनाच्या विरोधात जाहिर निषेध करून तीन कृषी कायदे रद्द झाले पाहिजे आशा घोषणा केली आहे , संजय गांधी निराधार योजना कमिठीचे शासकीय अध्यक्ष वैजनाथ लुल्ले ,काशीनाथ मानकरी सावकार, धनराज चिद्रे , संजय गांधी निराधार योजना कमिटीचे सदस्य कृष्णा पाटील , माजी सरपंच देवीदास पंतगे, सुभाष मामा पाटील, प्रताप कोयले बोरोळकर, नामदेव मुराळे, देवणी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बालुरे, जावेद तांबोळी, महादेव मळभागे, ईद्रीस भांतब्रे, रस्सीद मल्लेवाले, जाफर मोमीन, दाऊत भाई उंटवाले, बालाजी पवळे, माधव जाधव आणि राजकुमार जाधव सह अदिंची उपस्थिती होती.

0 Comments