माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांनी घेतली कोरोना लस
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) लातूरचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे मातोश्री माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येते घेतली कोरोनाची लस. आपणही आपल्या घरातील ज्येष्ठांना जवळच्या लसीकरण केंद्रात नेऊन लसीकरण करून घ्यावे. लस पूर्णतः सुरक्षित आहे जागतिक महामारीवर विजय संपादन करण्यासाठी लसीकरण हा अखेरचा टप्पा आहे. या टप्प्यापर्यंत सर्वांना सुरक्षित आणण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि खऱ्या अर्थाने हा लढा यशस्वी करून दाखविला आहे. याप्रसंगी माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकरनी (अक्कां) सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे , डॉ.प्रल्हाद सोळुंके , डॉ.शहाबाज वाढवणे , जगताप , श्रीमती माने , शिंदे , जाधव , मायदेवी पवार , पल्लवी श्रीमंगले आदी जण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments