भादा प्रशालेत तंबाखू मुक्त अभियाना अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांचे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण
शेख बी जी
भादा: दि.२३ - राष्ट्रीय तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत आरोग्यासाठी हानिकारक व घातक असलेले तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास टाळावे यासाठी गाव पातळीवर नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार सर्व शिक्षकांच्या सहकार्याने व श्रीमती खडके यांच्या नियोजनाप्रमाणे दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी प्रशालेत निंबध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत कन्या प्रशालेतील घोडके आरती (प्रथम), भादेकर वैष्णवी (द्वितीय), भादेकर आदिती (तृतीय), पठाण अलिशा (उत्तेजनार्थ),घोडके अनुश्री (उत्तेजनार्थ) व प्रशालेतील पाटील ओमकार (प्रथम), भादेकर विश्वजित (द्वितीय), शेख शौकत (तृतीय), उबाळे आवेश (उत्तेजनार्थ) यानी यश संपादन केल्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचारी श्रीमती वर्षा एमबडवार, चव्हाण व मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी , स्कूल बॅग, कंपास देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी सर्व उपस्थित शिक्षकासह प्रशालेचे दोन ट्रॉफी स्वीकारले आहेत. दोन्ही प्रशालेत 23 कर्मचारी कार्यरत असून देखील ही शाळा 100 % तंबाखू मुक्त आहे, असे दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी सांगितले. त्यामुळे या प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कौतुक होत आहे. कन्या प्रशालेतील मुलींना आरोग्याविषयीची माहिती श्रीमती एमबडवार यांनी दिली, सूत्रसंचालन श्रीमती खडके यांनी केले. हा कार्यक्रम कोविड-19 च्या सर्व नियमाचे पालन करून घेण्यात आला.

0 Comments