गॅस असल्यास शिधापत्रिका होईल रद्द? ही अफवा की सत्यता, ग्राहक संभ्रमावस्थेत
शेख बी जी
दि.३१ - राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिधापत्रिकेला आधार लिंक करण्याची प्रक्रिया सर्वत्र जोमाने चालू आहे. या प्रक्रियेमध्ये शिधापत्रिकेच्या फॉर्मवर गॅस जोडणी च्या संदर्भात माहिती विचारण्यात आली आहे. ही माहिती व्यवस्थित नाही भरल्यास शिधापत्रिका रद्द होईल अशी बतावणी प्रत्येक राशन दुकानदार करत आहेत. गॅसच्या संदर्भात अशा अफवा पसरवल्या जात आहेत. गॅसची माहिती दिल्यास शिधापत्रिका रद्द होणार आहे. त्यामुळे बरेच नागरिक गॅस जोडणी संदर्भात माहिती देण्याचे टाळत आहेत. संपूर्ण कुटुंबाची माहिती झाल्यानंतर ग्राहकाकडून शपथेवर विचारण्यात आले आहे की माझ्या कुटुंबातील कोणाच्याही नावे गॅस आहे किंवा नाही?ही माहिती अपूर्ण असल्यास किंवा दिलेली माहिती खोटी निघाल्यास शिधापत्रिका रद्द होण्यास तुम्ही स्वतः जबाबदार असाल. अशा प्रकारच्या हमीपत्रावर स्वाक्षरी करून ते राशन दुकानदारा कडे जमा करत आहेत. विद्यमान परिस्थिती मध्ये ग्रामीण भागात व शहरी भागात गॅस प्रत्येक कुटुंबाची गरज झाली आहे. प्रत्येकाकडे गॅस असल्याने हमीपत्रावर काय लिहावे या संभ्रमावस्थेत नागरिक असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. आधीच आधाराशी लिंक असलेल्या शिधापत्रिका पुन्हा आधारशी लिंक करण्याची गरज का भासावी ?असा प्रश्न नागरिकाकडून उपस्थित केला जात आहे.

0 Comments