Latest News

6/recent/ticker-posts

एमआयएम पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्तऔशात रुग्णांना सुकामेवा, बिस्किट वाटप

एमआयएम पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्तऔशात रुग्णांना सुकामेवा, बिस्किट वाटप


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख) दि.२ - एम आय एम पक्षाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वतीने काही नागरिकांना मास्क आणि औसा येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना खारीक, बदाम, काजू, तसेच बिस्किट वाटप करण्यात आले. ६३ वर्षापूर्वी पक्षाची स्थापना झाल्याने आता सर्वत्र पक्ष संघटना बांधण्याचे कार्य सुरू असून या पक्षाच्या वतीने जनहितासाठी पक्षाचे कार्यकर्ते सतत कार्य करत आहेत. दिनांक २ मार्च  रोजी पक्षाचे औसा तालुका प्रभारी अफसर शेख, सिद्दिकी मुखित, मुक्तार चौधरी, शेख नजीर, शेख समद, सय्यद आलादिन, शेख बिलाल, शेख कलीम, शेख असलम, तसेच वैद्यकीय अधीक्षक अंगद जाधव व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. औसा येथील कार्यक्रमाचे वृत्त कळताच जिल्हाअध्यक्ष ताहेर हुसेन यांनी औसा तालुका प्रभारी अफसर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments