Latest News

6/recent/ticker-posts

अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त चाकुर तालुक्यातुन विक्रमी रक्तदान करण्याचा संकल्प

अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त चाकुर तालुक्यातुन विक्रमी रक्तदान करण्याचा संकल्प


ओमप्रकाश झुरुळे जिल्हा समन्वयक तथा चाकूर तालुक्याचे निरीक्षक यांची माहिती

२१ मर्चाला चाकुर शहरात तर नळेगाव आणि वडवळ येथे २० मार्च रोजी रक्तदान शिबिर

चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर तालुक्यात विविध ठिकाणी अमित विलासराव देशमुख पालकमंत्री लातूर तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदांन शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. चाकुर शहरात,नळेगांव, वडवळ (ना), रोहीणा,चापोली, जानवळ, या ठिकाणी रक्तदान शिबीर होणार आहेत. यासंदर्भात वरील सर्व जिल्हा परिषद सर्कल मध्ये बैठक घेण्यात आल्या. या बैठका मध्ये प्रत्येकांनी आपण रक्तसंकलनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करुन रक्तदान करुन घेण्यांचा संकल्प केला. चाकुर शहरात २१ मार्च रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता, नळेगाव व वडवळ येथे २० मार्च रोजी शनिवारी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबीर होणार इतर ठिकाणच्या ही तारखा ब्लड बॅंकेशी चर्चा करून लवकर ठरतील असे सांगण्यात आले, चाकूर तालुक्यातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या महा रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करावे असे आहवान विलासराव पाटील यांनी केले आहे. राज्यात कोविड-१९ ची परीस्थिती व सामाजिक बांधिलकी म्हणून राज्याचे वैधकिय मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २१ मार्च २०२१  रोजी जिल्यातील सर्वच ठिकाणीं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यात २१०० बॉटल रक्तदान करून घेण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला असून त्यादृष्टीने चाकुर तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यात मोठा सहभाग नोंदवावा असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेस समन्वयक निरीक्षक ओमप्रकाश झुरुळे यांनी केले आहे. तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक सर्कलच्या प्रमूख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची शनिवारी बैठक घेण्यात आली बैठकीत त्यानी ही घोषणा केली आहे त्यादृष्टीने चाकुर तालुक्यात प्रत्येक सर्कल मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्ते व पदाधिकारी यानी कामाला लागावे असे आवाहन ओमप्रकाश झुरुळे जिल्हा समन्वयक,चाकुर तालुका निरीक्षक त्यांनी केले आहे. सध्या कोरोना मुळे अनेक उद्योग, व्यवहार ठप्प झाल्याने बाजारात मंदीची लाट असून अनेक आजारी लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने  सामजिक बांधिलकी म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीने  राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २१ मार्च रोजी  covid-19 सुरक्षीत अंतर राखून तालुका ग्रामपातळीवर व ग्रामीण भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यात तालुक्यातील विविध सेल अध्यक्ष , ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते स्थानीक नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले आहे. चाकुर तालुक्यातील नळेगांव,वडवळ,जानवळ, चापोली,रोहिणा,या जिल्हा परिषद सर्कल मधून जास्तीत जास्त रक्तदान करण्याचा संकल्प बैठकीतुन कॉग्रेस पक्षाचे पदआधिकारी व कार्यकर्ते यांनी संकल्प केला. यावेळी ओमप्रकाश झुरुळे जिल्हा समन्वयक,निरीक्षक चाकुर,एकनाथ पाटील ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष, सुरेश चव्हाण व्ही.जे.एन.टी. सेलचे जिल्हाध्यक्ष,विलासराव पाटील तालुका अध्यक्ष, आण्णासाहेब पाटील,रामराव बुदरे,सुरेश मुंडे,नागनाथ पकाले, रघुनाथ पाटील, राजेसाहेब पाटील, नर्सिंग वाघमारे, डॉ. पुडलिक चाटे,तुकाराम येदले, धनजय कोरे, विश्वनाथ पाटील, बाबूराव शिंदे, केशव सांगवे सरपंच कबनसांगवी,वैजीनाथ जिवलगे सरपंच रोहिणा,अंतेश्वर पाटील टाकळगाव सरपंच,भुजंग केंद्रे, किरण भिंगोले, शिवकुमार चांदसुरे,सचिन रेड्डी,नुर पटेल, माया सोरटे,बालाजी गंधगे,बी.एन.चाटे,युसुफ शेख, रामराव पाटील,केशवनाना शिरुरे,शमीम कोतवाल, शिवाजी जाधव,शेषेराव जोगदंड, बाबुराव शेटे, नागभुषण तांदळे,सतीश तोडारे,रशिकेश मुंडे, दाऊद बागवान,बालाजी कांबळे,राजु उदगिरे, भुजंग आर्जुने,पुंडलिक पाटील,आदमाने मछीद्र,गोविंद धोञे, प्रतिक तोडारे, गंगाधर केराळे, सिताराम मोठेराव माजी सरपंच चाकुर,शेख पप्पुभाई सं.गा.यो.सदस्य चाकुर,निलेश देशमुख युवक अध्यक्ष, चाकुरकर भागवत, शंकर मोरे,बबलू झांबरे,पुंडलिक पाटील, सलीमभाई तांबोळी मिडीया प्रमुख,भागवत फुले,अनिल शंके,चादसुरे, विजय धनेश्वर, सचिन चाकूरकर, सुनील शिंदे,,बाळु इरवाने, अनिल महालिंगे,गफुर मासुलदार, पाशा मचकुरी, आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments