Latest News

6/recent/ticker-posts

जि.प.कन्या प्रशाला येथील शिक्षकांनी घेतली कोरोनाची लस

जि.प.कन्या प्रशाला येथील शिक्षकांनी घेतली कोरोनाची लस


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथील सर्व शिक्षकांनी कोरोनाची लस घेतली येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, निलंगा येथे जाऊन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशिल्ड या नावाची लस घेतली कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यामध्ये कोरोनाचा आलेख वाढतच आहे त्याच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे प्रमाण शाळेत कमी होत आहे आपण आपली खबरदारी घ्यावी या उद्देशाने जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथील शिक्षकांनी आज लसीकरण करून घेतले अशी माहिती शिक्षक मधुकर सोनवणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments