कष्टाने पिकविलेली कोथिंबीर कवडीमोल विकल्याने शेतकर्यांवर मोठे संकट
बी डी उबाळे
औसा:(प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन एकर एकर कोथिंबीर लागवड साठी वीस हजार रुपये खर्च करून कष्टाने खर्च करून कष्टाने पिकविलेला चांगल्या प्रतीचा शेतीमाल कवडीमोल दराने विकण्याची पाळी आल्याने शेतकरी आर्थिक संकट कोसळल्याने हतबल झाला. याबाबतची माहिती अशी की तालुक्यातील भादा ता औसा येथील शेतकरी सुधाकर बळीराम गवळी यांना तीन एकर शेती शिवारात असून स न 127 आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्याने सिंचनाची व्यवस्था असल्याने दोन एकर मध्ये कोथिंबीर पेरली होती 45 कोथिंबीर पेरली होती 45 दिवसाच्या पिकातून कष्ट करून आर्थिक उत्पन्न घेण्याचे स्वप्न भंग पावले आणि केवळ वीस हजार रुपयेमध्ये दोन एकर कोथिंबीरचा प्लॉट विकण्याची पाळी कष्टाळू शेतकऱ्यावर आली. दोन एकर शेतीसाठी 6 हजार 500 रुपयांचे राणा कास्ती वानाचे बियाणे,3 हजार 900 रुपयांचे खत, 5 हजार रुपये खुरपणी,10 हजार रुपये फवारणी असे एकूण पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांनी नगदी रोख शेतीसाठी खर्च केला होता.घरातील राहणाऱ्यांची मजुरी तुषार सिंचनाद्वारे पाणी देणे शेतीचे येणारे लाईट बिल अशा स्वरूपाचा मोठा खर्च करीत सुधाकर गवळी या अल्पभूधारक शेतकऱ्याने कोथिंबीर चा दोन एकर चा प्लॉट अतिशय कष्टाने पिकवलेला होता परंतु अचानक बाजारपेठेत कोथिंबिरीचे भाव घसरलेने जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा बाळगून काबाडकष्ट करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याला 25 हजार रुपये रोख खर्च करून दोन एकर मधील कोथिंबीर केवळ वीस हजार रुपयात विकण्याची पाळी आली.शेतकरी शेतात काबाडकष्ट करून भरीव उत्पन्नाची आशा बाळगतो परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील शेतीमालाचे भाव याचा नेमका अंदाज लागत नसल्याने अखेर कष्टाळू शेतकऱ्याला कवडीमोल भावाने कोथिंबीर टाकावी लागली असल्याने शेतकऱ्यावर लागली असल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले आहे.

0 Comments