भारतीय बौद्ध महासभेचा देवणी तालुकाध्यक्षपदी महेश काळे तर सचिव पदी विक्रम गायकवाड यांची निवड
देवणी:(तालुका प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्नजी आशोकराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा अध्यक्ष कुमार भाऊ सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक लातूर जिल्ह्याचे मुख्य सचिव रवींद्र सीरसाठ, सुरेंद्र कांबळे हे उपस्थित होते. या बैठकीचे अध्यक्ष कुमारभाऊ सोनकांबळे लातूर जिल्हाध्यक्ष हे होते. सर्व प्रथम तथागत महाकारूणी भगवान बुध्द आणि बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्रमुख पाहुणे यांचा स्वागत करण्यात आला. या बैठकीत महेश काळे यांची देऊन तालुका अध्यक्ष पदावर व विक्रम गायकवाड यांची देऊन तालुका सचिव पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा कमिटीच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले. या बैठकीस उपस्थित सर्व सदस्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक गणेश भाऊ कांबळे यांनी केले. आतिशय मार्मिक व मुद्दे सुद्द मार्गदर्शन आयु लातूर जिल्ह्याचे मुख्य सचिव रवींद्र शिरसाठ सर जिल्हाध्यक्ष कुमार भाऊ सोनकांबळे यांनी केले व नूतन कार्यकारणीस मान्यता दिली. नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे महेश काळे -देवणी तालुका अध्यक्ष, भैय्यासाहेब तुकाराम देवणीकर -देवणी तालुका उपाध्यक्ष, गौतम गायकवाड - देवणी तालुका उपाध्यक्ष, आत्माराम श्रीपती गायकवाड -देवणी तालुका मुख्य सचिव, विक्रम गायकवाड -देवणी तालुका सचिव, विठ्ठल गायकवाड -देवणी तालुका कोषाध्यक्ष, अक्षय मल्हारी शिंदे - देवणी तालुका पर्यटन प्रमुख, महेंद्र रमेश काळे -सदस्य, भिम दर्शन राजकुमार बोरे - सदस्य सर्व पदाधिकाऱ्याचा लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष कुमार भाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. रवींद्र शिरसाट मुख्य सचिव लातूर व लातूर जिल्हा सचिव उभगवान ईसाळे जिल्हा यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संरणत्तय ने बैठक संपन्न झाली. सुत्रसंचालन भगवान ईसाळे यांनी केले. यावेळी देवणी तालुक्यातील सन्मानिय सदस्य उपस्थित होते तर आभार आत्माराम श्रीपती गायकवाड यांनी मानले.

0 Comments