Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद कन्या प्रशाला निलंगा येथे तंबाखू मुक्त शाळा अभियान

जिल्हा परिषद कन्या प्रशाला निलंगा येथे तंबाखू मुक्त शाळा अभियान


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. या अभियानात पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना " तंबाखू मुक्त शाळा " या विषयावर निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेतेत प्रथम , द्वितीय , तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. अभियानासाठी आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ.शीतल चव्हाण व श्रीमती रीना डुमलवाड यांनी निलंगा येथील जि.प.कन्या प्रशाला येथे भेट देऊन तंबाखूचे दुष्परिणाम मानवी शरीरावर कसे होते त्यातून अनेक रोगांची उत्पत्ती होते व कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी असे आवाहन डॉ.चव्हाण मॅडम यांनी केले. कोरोना  covid-19 चा संसर्ग होऊ नये यासाठी काय काय उपाययोजना कराव्या यासंदर्भात सविस्तर माहिती डॉ.शीतल चव्हाण मॅडम यांनी दिले.या प्रसंगी उपस्थित शाळेतील शिक्षक , शिक्षिका , विद्यार्थींनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments