Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालय निटूर येते तंबाखू मुक्त भारत या विषयावर निबंध स्पर्धा संपन्न

महाराष्ट्र विद्यालय निटूर येते तंबाखू मुक्त भारत या विषयावर निबंध स्पर्धा संपन्न


निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर च्या वतीने "तंबाकू मुक्त भारत" या विषयावर निबंध स्पर्धा निलंगा तालुक्यातील निटूर येथील महाराष्ट्र विद्यालय येते आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय निटूर येथे प्रथम तथा कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत विद्यालयातून प्रथम येण्याचा मान गस्ते अयुब गौस यांने पटकावला तर द्वितीय राजे अजिंक्य लक्ष्मण, तृतीय सोमवंशी प्रणिता, तर उत्तेजनार्थ हजारें संतोष, शेख महंमद, भोसले राजश्री यांनी मिळवला याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.जयश्री माने व श्रीमती आश्विनी महाजन, श्रीमती ज्योती इंगळे यांच्या हस्ते कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणात देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती डॉ.जयश्री माने यांनी तंबाखूचे दुष्परिणाम मानवी शरीरावर कसे होते त्यातून अनेक रोगांची उत्पत्ती होते व कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी असे सविस्तर मार्गदर्शन श्रीमती डॉ.माने यांनी केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक नाईकवाडे , पाटील , सूर्यवंशी  भोयबार , जाधव , देशमुख आदी जण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments