Latest News

6/recent/ticker-posts

विनापरवाना उत्खनन करणाऱ्या शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करा मनसेने केली प्रशासनाला मागणी

विनापरवाना उत्खनन करणाऱ्या शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करा मनसेने केली प्रशासनाला मागणी


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) मोठ्या प्रमाणात विनापरवाना उत्खनन करणाऱ्या शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करा शारदा कंपनीचे अनेक शाखांचे उत्कलन परवाने संपले असून विनापरवाना शासन महसूल बुडवून उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा व महसूल वसूल करा या मागणीचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाने यांच्या नेतृत्वाखाली निलंगा उपजिल्हाधिकारी विकास माने यांना देण्यात आले यावेळी निलंगा तालुका अध्यक्ष सूरज पटेल,सचिव जाकीर शेख, कृष्णा सुरवसे,अबूबकर सय्यद, इम्रान सय्यद, गणेश बिराजदार, विकास सूर्यवंशी,नजीर मुजावर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments