निलंगात हवा टाईट रात्री आठ वाजल्यापासून कर्फ्यू नाईट
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) नागरिकाची बाजारपेठेत दिवसभर धावपळ निलंगा शहरासह जिल्ह्यात कोरोनाने दुसऱ्यांदा तोंड वर काढले असल्याने लातूर जिल्हा पुन्हा डेंजर झोनमध्ये येण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी आज दिनांक 15 मार्च पासून रात्री आठ वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला असल्याने नागरिकांची आज दिवसभर चांगलीच हवा टाईट झाल्याने नागरिक खरेदीसाठी व इतर कामासाठी आज दिवसभर चांगलीच धावपळ बाजारपेठेत व शहरात करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले निलंगाची बाजारपेठ मोठी असल्याने ही बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत चालत असते जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता सर्व प्रकारचे दुकाने आस्थापने हॉटेल व्यापार अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवावी लागणार आहेत त्यामुळे आज दिवसभर नागरिकांमध्ये मोठी धावपळ निर्माण झाली होती आज रात्री आठ वाजता संचारबंदी लागू होणार असल्याने सायंकाळी सात पासूनच दुकाने बंद ठेवण्याची धावपळ नागरिक करताना दिसून येत होते नागरिकांना देखील अनावश्यकपणे रात्री निलंगा शहरात आठ नंतर फिरता येणार नाही त्यामुळे आज सकाळपासूनच नागरिकाने निलंग्याच्या बाजारपेठेसह इतर ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

0 Comments