Latest News

6/recent/ticker-posts

समाजकंठक वसीम रिजवी यांच्या गुन्हा दाखल करा;मुस्लिम समाज बांधवांची पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांना निवेदन देऊन मागणी

समाजकंठक वसीम रिजवी यांच्या गुन्हा दाखल करा;मुस्लिम समाज बांधवांची पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांना निवेदन देऊन मागणी


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) मानवतेला काळीमा लागेल असे बेतुका मागणी करुन प्रविञ धर्मग्रंथ कुराण मधील अयाती कमी करावे म्हणून मागणी करणाऱ्या समाजकंठक वसीम रिजवी विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी चाकुर तालुक्यातील मुस्लिम बांधवाकडुन चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या कडे निवेदन देऊन समाजकंठका विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी पोलीस उपनिरीक्षक खंडु दर्शने उपस्थित होते. सविस्तर माहिती अशी आहे की, मुस्लिम धर्माचे पविञ ग्रंथ कुरआन शरीफ मधील 26 आयात कमी करावे अशी करावे अशी मागणी लखनौ उत्तर प्रदेश येथील समाजकंठक वसीम रिजवी यांनी केली आहे. सदरची मागणी अत्यंत चुकीची असुन मानवी समाजाला काळीमा फासणारी आहे. देशभरातील करोडो मुस्लिम समाज बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुस्लिम समाजांमध्ये कुराअन शरीफला पविञ मानले जाते. सदर वसीम रिजवी या समाज कंठकाने वरील मागणी केल्यामुळे  मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. वसीम रिजवी समाजकंठका विरोधात भा.द.वी.295 नुसार तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी केली आहे. निवेदनांवर शेख पप्पुभाई,सलीमभाई तांबोळी,शेख इलियास,बिलाल पठाण,शेख ताज,सौदागर अझहर,हैदर बागवान,नबी सय्यद,अब्बास शेख,मुबारक दुबईवाले,इलाही बागवान,सय्यद हुसेन,इस्माईल बुलंनभाई,महेबुब पठाण,बागवान आलीम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments