कोकळगाव मध्ये महाशिवरात्री निमित्त लिंगपूजन
मदनसुरी:((प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील महादेव मंदिरात शिवभक्तांची सकाळपासूनच अभिषेक, महापूजा,आरती करण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या.महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी मंदिर व मंदिर परिसरातील साफसफाई केली.सायंकाळी सहा वाजता लिंगायत समाजाचे गुरू पंचय्या स्वामी व गावातील शिवभक्त यांनी सामूहिक लिंग पूजन केले.लिंगपूजनानंतर लिंगाचे महत्व, लिंग पूजा का करावी, लिंगपूजा कशी करावीं याविषयी सविस्तर मार्गदर्शन पंचय्या स्वामी यांनी शिवभक्तांना केले.यावेळी सुरेश लामतुरे, संजय लड्डा, संतोष मेहकरे,धनराज लामतुरे,दयानंद पाटील,स्वरूप सालेगावे,नरसिंग पाटील,तसेच गावातील महिला लहान थोर शिवभक्त यांची उपस्थिती होती.सामाजिक अंतर राखूनच लिंग पूजनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमा नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

0 Comments