आग लागून शेती साहित्यासह कडबा जळाला
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे)औसा तालुक्यातील भादा येथील शेतक-याचा आग लागल्याने शेती साहित्यासह कडबा जाळून खाक आल्याची घटना नुकतीच घडली आहे.
औसा तालुक्यातील भादा येथील अ भूधारक शेतकरी वामन सदाशिव कोळी यांच्या भादा गावाजवळच असलेल्या शेतीमध्ये रविवार दि 4 एप्रिल 2021 रोजी पहाटे 1 वा 30 मिनिटाने अचानक आग लागल्याने शेती साहित्य जळाले यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीचा कडबा 400,गुळी सोयाबीन,फडम पाईप एक हजार फूट,चवाळे आदी इतर शेती साहित्य जळल्याचे शेतकरी वामण कोळी यांनी सांगितले यावेळी भादा सज्जाचे तलाठी राम दुधभाते याच्याशी संपर्क साधला असता पंचनामा करून तहसिलला दाखल करून शेतकऱ्याला शासकीय मदत मिळवून दिली जाईल असे त्यांनी सांगितले.


0 Comments