Latest News

6/recent/ticker-posts

गृह प्रवेश पूजा रद्द करून गरजू नागरीकांना अन्नधान्य कीटचे वाटप;रमाई-सावित्रीच्या लेकीचा स्तुत्य उपक्रम

गृह प्रवेश पूजा रद्द करून गरजू नागरीकांना अन्नधान्य कीटचे वाटप;रमाई-सावित्रीच्या लेकीचा स्तुत्य उपक्रम


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) गृह प्रवेशाचा कार्यक्रम रद्द करून आर्थिक अडचणीत असणाऱ्या गरजू नागरीकांना अन्न धान्य किटचे वाटप करून अडचणीत असणाऱ्या नागरीकांना मदतीचा अन मानवता आणि माणुसकीचा हात देत केले सामाजीक कार्य पूर्ण अशी ही शोभली रमाई, सावित्रीची,जिजाऊची लेक अशीच प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी भादा येथे कार्यरत शिक्षिका जयश्री बनसोडे यांच्या कार्यावर व्यक्त केली. जयश्री प्रल्हादराव बनसोडे यांचा जन्म 1 जानेवारी रोजी लातूर येथे झाला.एक भाऊ आणि चार बहिणी असे त्यांचे कुटुंब. लातूरमध्येच वडील नोकरीस होते. यामुळे सुशिक्षित कुटुंब असल्याने आई वडिलांनी सर्व भावंडांना शिक्षण दिले. आज एक भाऊ जूनियर इंजीनियर पिंपरी चिंचवड पुणे महापालिकेत कार्यरत आहे, आणि चारही बहिणी शिक्षणामुळे स्वतःच्या पायावर उभे आहोत. 


सध्या शिक्षिका या जी प प्रशाला भादा तालुका औसा येथे कार्यरत आहे. तसेच पती महेश पंढरीनाथ कांबळे हे आनंदनगर भादा येथे कार्यरत आहेत. त्यांचे सासर वरवडा असून अगदी भादा गावाच्या शिव शेजारीच आहे. गरिबीची पती-पत्नीला दोघांनाही जाणीव असून त्यामुळे त्यांच्या शाळेत गोर गरिबाचे विद्यार्थी आहेत. त्यांना चांगले शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. कोरोना काळात भादा येथील 65 गरजू कुटुंबांना एक महिण्यासाठीची गरज भागेल अशा आवश्यक अन्नधान्य वस्तूचे किट दि 14 एप्रिल 2020 रोजी गृहप्रवेशाचा कार्यक्रम रद्द करून वाटप करण्याचा निर्णय घेतला तत्कालीन सरपंच दिनकर माळी, माजी सरपंच पांडूरंग कात्रे, उपसरपंच बी एम शिंदेे, ग्रामसेवक उमेश बनसोडे, सुरेश लतुरे, राम पाटील आणि विविध सामाजिक कार्यकर्ते भादा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे गरिबीची जाणीव असल्यामुळे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील असतात व विविध उपक्रम राबवून मुले सर्वगुणसंपन्न व्हावेत यासाठी त्या विशेष प्रयत्नशील असतात.

Post a Comment

0 Comments