"लाॅकडाऊन झाल्यास आम्ही कुठे जावे ?" रोज कसरत करुन पोट भरणाऱ्यांची आर्त हाक
शेख बी जी
औसा: दि. ४ - कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लाॅकडाऊन ची प्रक्रिया होणार अशी चर्चा जोरात चालू आहे. अशावेळी रोज मजुरी करून पोट भरणाऱ्यांची तसेच वेगवेगळ्या प्रकारची कसरत करून आपली उपजीविका भागवणाऱ्या लोकांचे काय ? हा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वांना उपजिविकेसाठी उपलब्ध अन्नसाठा पुरवण्याची जबाबदारी शासनाची असते. मात्र जी यंत्रणा मध्ये काम करणारी असते ती यंत्रणा कुचकामी किंवा भ्रष्टाचार युक्त असेल तर अनेकांचे हाल होतात. यापूर्वीच्या लॉकडाऊन मध्ये अनेकांचे असे हाल होऊन बऱ्याच जणांचा मृत्यू ओढवला होता. उपासमारीने जीव गमावण्याची वेळ बऱ्याच जनांवर आली होती. लाॅकडाऊन च्या काळामध्ये अनेक अन्नदाते बाहेर येऊन जनतेची सेवा करतात. बरेच जण चमकोगिरी साठी ही अशी कामे करत असताना दिसतात. याव्यतिरिक्त अनेक जण "या हाताचे त्या हाताला" न कळू देता सेवा करत असतात. चमकोगीरी करणार्या लोकांच्या मागे धावणे योग्य नाही. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना ही तारेवर कसरत करतअसलेली मुलगी असे तर म्हणत नसेल ना कि साहेब आमचे यापुढे कसे ?
लाॅकडाउन चा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी संपूर्ण राज्यात होत आहे. एखाद वेळेस कडक निर्बंध लावले तर चालतील. मात्र लाॅकडाउन चा निर्णय योग्य नाही. असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात असल्याचे दिसून येत आहे.


0 Comments