जनावराच्या गोठ्याला लागली आग, शेतकऱ्यांची मोठी नुकसान
शिरोळ (वां):(प्रतिनिधी/सलीम पठाण) मौजे शिरोळ (वां.) ता.निलंगा येथील शेतकरी मैनोद्दीन तांबोळी यांच्या शेतातील गोठ्याला दि. 3 च्या रात्री अचानक आग लागुन दोन बैल आणि एक पारडु यांचा होरपळुन जागीच मृत्यु झाला. गोठ्याच्या बाजुला असलेली कडब्याची बनीम पण जळुन खाक झाली. या आगीत शेतकऱ्याचे खूप मोठे नूकसान झालं आहे. आधीच शेतकरी हैराण आहे त्यात ज्याच्या जिवावर शेतकरी उभारी घ्यायचा प्रयत्न करतो ती सर्जाराजाची जोडीच आगीच्या भक्षस्थानी पडली. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. माझं संसार कस चालायचं मी त्या जोडीला लेकरसारखं साभंळत होतो माझ्यावर खूप मोठे संकट ओढलेले आहे तरी मला उभारी मिळण्यासाठी शासनाने माझे नुकसान पाहता मला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी मैनोद्दीन तांबोळी यांनी केली आहे.
0 Comments