भादेकरांची तहान कधी भागणार सार्वजनिक विहिर खोदकामाच्या प्रतीक्षेत
लातूर(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) औसा तालुक्यातील भादा येथील सार्वजनिक पाणीपूरवठा विहीर सध्या खोदकामाच्या प्रतीक्षेत असल्याने नागरिक पाण्यासाठी सतत ग्रामपंचायतकडे पाठ पुरावा करीत आहेत. गेल्यावर्षी सुरु केलेले काम उदघाटनाच्या मानापाणामुळे बंद पाडण्यात आलेची चर्चा सुरू आहे.यामुळे ते अपूर्ण राहिले असून आता हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी नागरिक हैराण झाले असून यावर्षी लवकर काम सुरु केले तर लवकर पूर्ण होईल आणि गावासाठी पाणी मिळेल अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहेत. सध्या भादा गावासाठी पाच ते सहा किमी अंतरावरून पाणी येते अनेक समस्या हे पाणी गावात येईपर्यंत अनेक समस्या निर्माण होतात यामुळे पाणी पुरवठा होण्यास विलंब झाल्याने उन्हामध्ये नागरिकांना मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे, तर पाणी पुरवठा खंडित होण्याचे कारण हे पाईपलाईन फुटणे ,लाईट जाणे,विद्युत मोटार खराबी अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत परंतु सध्या सुरू होणारे नवीन सार्वजनिक विहिरीचे काम आगदी गावालगत एक किमीच्या आतमध्ये येते यामुळे गावासाठी हमखास पाणी मिळणार असल्याने हे काम लवकर सुरु होऊन ते पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत नागरीक व्यक्त करीत आहेत. कारण सध्या गावामध्ये विविध भागात पाणी मिळण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात यामुळे गावासाठी असलेल्या विहिरीला पाणी आहे किंवा नाही याबाबत नागरिकात द्विधा मनस्थिती निर्माण होत आहे. येत्या आठ दिवसांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा नाही झाला तर ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढण्याचे नियोजन असल्याची चर्चा सामाजिक कार्यकर्त्यांसह गावक-यात जोर धरत आहे तर यासाठी ग्रामपंचायतने नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
0 Comments