कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रसुती 108 गाडीत
निलंगा :(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे सरकारी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची कोरोना तपासणी करणे चालू आहे. आज दि. 3 रोजी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येते प्रसुती कक्षामध्ये अवगड बाळंतपणासाठी रुग्ण आला असता त्या रुग्णांची कोरोना तपासणी केली असता त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता तरी पण त्या रुग्णांची बाळंतपण करण्यास प्रयत्न केले नाईलाज त्या रुग्णांना लातूर ला 108 गाडीत पाठविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीपजी सौंदळे व डॉ.दिनकरजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ ए. शिंदे यांना 108 गाडीत पाटविण्यात आले होते वैद्यकीय अधीक्षक डॉ.सौंदळे व डॉ.पाटील हे स्टाफ शिंदे यांच्या सतत संपर्कात होते. गाडी बुधोडा च्या जवळ गेली असता बाळंतपण झाले. स्टाफ शिंदे हे आपल्या जीवाची पर्वा न करता त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रसुती व्यवस्थितरित्या केले यांच्या या अलौकीक कार्याबद्दल सर्वच स्तरातून स्टाफ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0 Comments