कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांचा "मनसे"सत्कार
चाकुर:(प्रतिनिधी/सलीमभाई तांबोळी) आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चाकूर नगरीचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ठ प्रशासकीय हताळणीमुळे जनतेला रस्ते,पाणी,वीज,आरोग्य या विविध अत्यावश्यक सेवांमध्ये न्याय मिळत असलल्याबद्दल जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे साहेब यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला.या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ दीपक लांडे,तालुकारोग्यअधिकारी डॉ अर्चना पंडगे,तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी,कृषितालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,शहराध्यक्ष अजय धनेश्वर,मारोती पाटिल, राहुल आरदवाड, नारायण पस्तापुरे, लक्ष्मण बोईनवाड,कृष्णा बोबडे, विष्णु बोबडे, कृष्णा गीरी, बडगिरे योगेश आदि उपस्थित होते.

0 Comments