Latest News

6/recent/ticker-posts

लिंबन महाराज यांचा मतदारसंघासाठी निधी खेचून आणल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त सत्कार

लिंबन महाराज यांचा मतदारसंघासाठी निधी खेचून आणल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त सत्कार


निलंगा: (तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लिंबंन महाराज रेशमे  यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी जवळपास 80 लाखांचा निधी विविध विकास कामासाठी मंजूर करून आणल्याबद्दल निलंगा विधानसभेतील शिवसेना व युवासेने तर्फे सत्कार करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल लिंबन महाराज रेशमे यांचा विधानसभेतील अनेक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त मराठवाडा संपर्क प्रमुख तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर , पालकमंत्री अमितजी देशमुख , पर्यावरण राज्यमंत्री संजयजी बनसोडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे , गोरखनाथ महाराज औसेकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर , अभय साळुंखे , दिनकरजी माने , जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, जिल्हा प्रमुख शिवसेना लातूर फोनवरून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच तालुकाप्रमुख भागवत वंगे, शिरूरअनंतपाळ , पंडीतअण्णा भंडारी तालुकाप्रमुख देवणी, प्रा.अण्णासाहेब मिरगाळे, उपजिल्हाप्रमुख युवासेना लातूर, प्रशांत वाजरवाडे युवासेना तालुकाप्रमुख, प्रसाद मठपती शुभम डांगे, सतीश रुपनर, यशवंत बसपुरे, सतीश धायगुडे, सागर स्वामी, बाळू निलंगेकर, सागर सौरडे, निलेश सौरडे, सोनू वाघमोडे, दीपक जाधव, बलवान कांबळे इत्यादींच्या हस्ते सत्कार करण्यात आला शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments