Latest News

6/recent/ticker-posts

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी चापोली ग्रामपंचायत देणार आर्थिक मदत

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी चापोली ग्रामपंचायत देणार आर्थिक मदत


चाकुर:( ता.प्र.सलीमभाई तांबोळी) खरं तर आजही समाजामध्ये अनेक अशा कुटुंब आहेत ज्यांना अंत्यसंस्कार करायला सुद्धा मृतदेह घरात ठेवून इतरांना आर्थिक सहकार्य मागावे लागते. परंतु अशा पद्धतीची  चापोलीमध्ये वेळ कोणावर येऊ नये यासाठी चापोलीचे उपसरपंच निसार देशमुख यांच्या संकल्पनेतून नवीन आर्थिक वर्षापासून अर्थातच 1  एप्रिल 2021 पासून चापोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निधन पावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या प्रथम वारसास स्वतः ग्रामपंचायत चा कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ग्रामपंचायत च्या वतीने तीन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती चापोली सरपंच सौ रेखाताई निलेश मद्रेवार, उपसरपंच निसार देशमुख, ग्रामविकास अधिकारी हणमंत मुरुडकर यांनी दिली आहे. "चापोली ग्रामपंचायतीने चापोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निधन पावणाऱ्या व्यक्तीच्या प्रथम वारसास तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे जे गोरगरीब वंचित घटक आहे यांना निश्चितच मदत होणार आहे आम्ही हा निर्णय घेतला आहे _ सरपंच सौ रेखाताई निलेश मद्रेवार

  " माजी उपसरपंच जिलानी शेख यांनी एके दिवशी माझ्याकडे ही संकल्पना मांडली व प्रभाग क्रमांक चार मधील सुद्धा एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि ती मी माझ्या वतीने दिली परंतु जर आपण गावकर्‍यांचा विचार करून जर हा निर्णय सार्वजनिक स्वरूपासाठी घेतला तर तो  प्रत्येकाच्या हिताचा असेल असा विचार करून मी मासिक बैठकीत हा  प्रस्ताव मांडला व आमच्या सरपंच सौ रेखाताई निलेश मद्रेवार व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी हनुमंत मुरुडकर यांनी सर्व प्रशासकीय गोष्टींची पूर्तता करून या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू केलेली आहे.

Post a Comment

0 Comments