Latest News

6/recent/ticker-posts

मातीच्या माठाला फ्रिजचा थाट ग्रामीण भागात मागणी वाढली

मातीच्या माठाला फ्रिजचा थाट ग्रामीण भागात मागणी वाढली


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) यावर्षी मध्य मार्च महिन्यापासूनच सर्वत्र तापमानाची झपाट्याने वाढ झाल्यामुळे शरीराचे तापमान सौम्य आणि शीतल करण्यासाठी शीतल पाणी शरीरास आवश्यक असल्याने मातीच्या माठाची मागणी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यात माठांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मातीचा चिखलाचा गोळा फिरत्या चाकावर ठेवून हाताच्या कलेने मातीचे भांड्यात रूपांतर करून त्याला आकर्षकता आणणे हा कलाकुसर करून उपजीविका चालवणाऱ्या काही ठराविक  व्यावसायिकाचा मुख्य व्यवसाय आहे. विज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली असूनही हे युग विज्ञानयुग म्हणून ओळखले जात असले तरी जुने ते सोने म्हणून ओळखले जाते. त्यामुळे माठांची एक आगळीवेगळी ओळख आजही कायम आहे. 21 व्या शतकातही माठांचा थाट कायम असून उन्हाळ्याच्या दिवसात घशाला पडणारी कोरड शमविण्यासाठी थंड पाण्यासाठी मातीचे भांडे बनविलेल्या माठाचा उपयोग घरोघरी होताना दिसत आहे. एवढेच नाही तर फ्रीज व पाणी फिल्टर च्या आजच्या जमान्यातही ग्रामीण भागात माठाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते . माठाची मागणी मोठ्या प्रमाणात असून मोठ्या प्रमाणात माठ विक्री होताना दिसत आहेत.फ्रिज बरोबर माठातील लागणारे चवदार असे गोड व थंडगार पाणी असल्याने माठाचा थाट कायम आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सामान्य जनता आजही माठालाच पहिली पसंती देत असल्याचे दिसून येते. हाताने बनविलेल्या मातीच्या भांड्याला  प्राचीन काळी मोठ्या प्रमाणात महत्त्व होते व त्याची मागणीही मोठ्या प्रमाणात होती. आजच्या आधुनिक काळात मातीच्या भांड्यांची व मूर्तींची जागा आधुनिक कलाकुसरीने बनविलेल्या चिनी मातीच्या व प्लास्टिक ने घेतली आहे. तरीही गरिबाच्या फ्रिज म्हणून मातीच्या माठाचे अस्तित्व आजही कायम आहे. आज-काल सर्वसामान्यांना फ्रिज हे  आर्थिक दृष्ट्या परवडत नाही आणि त्यापासून शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि तो अनेक कुटुंबाना परवडत नाही त्यामुळे उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी धावपळ सुरू होते. माठ गळके निघणार नाहीत याची काळजी कुंभाराला घ्यावी लागते  चिखल पायाने तुडवतात त्या चिखलाच्या गोळ्याला फिरत्या चाकावर मातीला आकार देत मातीचे भांडे , व माठ बनवले जाते. यानंतर तासन्तास शेकल्यानंतर गरीबाचा फ्रिज म्हणून ओळखला जाणारा माठ तयार होतो. काळ बदलला तरी विक्री कायम गेल्या अनेक वर्षापासून सुरुवातीला बिस्लरी,नंतर  मिनरल वॉटर,जार आल्याने नागरिकांचा कल बदलला आहे.तर पाण्याचे पाऊच,बॉटल यांची भर पडल्याने पारंपारिक व्यवसाय करणारे अडचणीत सापडले आहे.तसेच सध्या फ्रिजच्या किमती घसरल्या आहेत. बाजारात आठ ते दहा हजारात फ्रिज उपलब्ध झाली आहेत तरीही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात माठाची मागणी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments