Latest News

6/recent/ticker-posts

लॉकडाऊन करू नका यासाठी वंचितचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लॉकडाऊन करू नका यासाठी वंचितचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन करू नये यासाठी जिल्हाधिकारी यांना  उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. मार्च 2020 पासून कोरोना संसर्ग चालू आहे त्यामुळे मागच्या काळात अनेक महिने लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे मोलमजुरी करणारे, कामगार, शेतकरी, शेत मजूर यांना अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा त्यांना पैश्याअभावी घेणे झाले नाही. त्यांना हाताला कामच मिळाले नाही. त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली होती.तसेच गाव ,खेडे ,शहर या ठिकाणच्या लोकांनी, बचत गटांनी मायक्रो फायनान्स विविध बँका कडून कर्ज घेतलेले असते त्यांच्या वसुलीसाठी पंधरादिवसाला, महिन्याला वसुली अधिकारी येत असतात व कर्जाची परतफेड केली जाते. जर लॉकडाऊन पडला तर त्यांना कर्ज परतफेड करणे शक्य नाही. मागच्या वर्ष भरात शिक्षण घेनाऱ्या विद्यार्थ्यांचे खूपच नुकसान झाले आहे. ऑनलाइन शिक्षण गरीब विद्यार्थ्यांसाठी होत नाही त्यांची परीस्थिती तशी राहत नाही अश्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कारण मोबाईल राहत नाही, असेल तर रेंज राहत नाही. शासनाने लॉकडाऊन न करता दुसरे जे निर्बंध लागू करता येतील ते करावेत. ते योग्य राहील. अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गोरगरिबांसाठी जर लॉकडाऊन अडसर ठरत असेल तर तो आम्ही पाळणार नाही. शासनाच्या विरोधात आमच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुका अध्यक्ष भरत गायकवाड, तालुका उपाध्यक्ष विजय उस्तुरे,नागेश कांबळे,बलभीम सूर्यवंशी, अंकुश कांबळे, दत्ता सूर्यवंशी, विजयकुमार सूर्यवंशी, बालाजी कांबळे, गोरोबा पुटे इत्यादीं जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments