कोरोनाच्या सुरक्षेसाठी आठवडी बाजार बंद
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) दि. 1 - जिल्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जिल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी दिलेल्या आदेशानुसार कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नळेगाव येथील रविवार व मंगळवार या दिवसांचा आठवडी बाजार न भरविण्याचा निर्णय प्रशासनाकडून व ग्रामपंचायतने घेतला असून जनावरांच्या बाजारात महाराष्ट्रासह इतर राज्यातून जनावरे,शेतकरी,व्यापारी मोठ्या येऊन मोठी गर्दी होत असल्यामुळे तसेच रविवारचा भाजीपाल्याचा आठवडी बाजारासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात नळेगावच्या बाजारासाठी येत असतात.बाजारात भाजीपाला,व इतर संसार उपयोगी सामान खरेदीची रेलचेल मोठ्या प्रमाणात होत असते.यासाठी आठवडी बाजारात येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते.नागरिक एकत्रित आल्याने कोरोना व्हायरस पसरण्याची भिती घेऊन हा आठवडी बाजार न भरण्याची माहिती ग्रामपंचायत व ग्रामविकास अधीकारी शिंगे यांनी दिली असून गावात कोरोना रोगावर प्रतिबंध करण्यासाठी हात स्वच्छ धुवा,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा मास्कचा वापर करा, मास्कचा वापर न करणाऱ्यास 500 रुपये दंड आकारून दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.जर गावातील कोणालाही कोरोनाचे लक्षण जाणवल्यास तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ सुधीर चव्हाण,डॉ राजकुमार टकटवळे, डॉ सुधाकर जाधव यांनी दिली.

0 Comments