पोलिस नाईक निशीधन शिंदे यांचे दुःखद निधन;शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात वाहीली श्रध्दांजली
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ: येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक निशीधन माणिकराव शिंदे वय ३६ यांचे गुरूवारी पहाटे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस नाईक निशीधन शिंदे हे शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना आज पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम व कर्मचार्यानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून श्रंध्दाजली वहाण्यात आली. शिंदे यांचे लातूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मेहनतीच्या जोरावर २००६ साली त्यांनी पोलीस दलात नोकरी मिळवली होती. सुरूवातीला लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काही वर्षे नोकरी झाल्यानंतर शिरूर अनंतपाळ येथे बदली झाली होती. त्यानी कोरोनाचा संकट काळात महत्त्वाची भूमिका बजाविली होती. गुरूवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, तीन भाऊ असा परिवार आहे. पोलिस दलासह मित्र परिवारांच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

0 Comments