Latest News

6/recent/ticker-posts

नागनाथ भगवंत पाटील यांना वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर

नागनाथ भगवंत पाटील यांना वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर


नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) दि. - चाकूर तालुक्यातील लिंबळवाडी प्रयोगशील तरुण शेतकरी जे कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग व योजना राबवणारे येथील नागनाथ भगवंत पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सण 2018 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लातूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण  सभापती रोहिदास वाघमारे,जि.प. कृषी सभापती गोविंदराव चिलगुरे,जिल्हा कृषी अधिकारी चोले, तालुका कृषी अधिकारी पवार यांच्या हस्ते लिंबाळवाडी येथील नागनाथ भगवंत पाटील यांच्या स्वगृही त्यांचा व परिवारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावचे नूतन सरपंच शरद पाटील,गणेश येळापुरे, बाळासाहेब येळापुरे व तसेच गावातील शेतकरी मित्र उपस्थित होते.लिंबाळवाडी व नळेगाव परिसरातून पाटील परिवारांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments