जिल्हा परिषद सीईओ गोयल याच्या वाढदिवसानिमित्य विविध उपक्रम
देवणी:(शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) होनाळी येथे अभिनवजी गोयल (मुख्य कार्यकारी अधिकारी जी प लातूर ) यांच्या वाढदिवसानिमित्य अंगणवाडी येथे फळ वाटप करण्यात आले व ग्राम पंचायत येथे पवित्र नारळाचे झाड लावण्यात आले व सार्वजानिक सौचालाय उद्धघाटन करण्यात आले, जलजीवन मिशन उपक्रम अंतर्गत नळ जोडणीचे 100% काम पूर्ण करून हर घर जल ची संकल्पना पूर्ण करण्यात आली यावेळी देवनी तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी जेष्ठ समाजसेवक गुंडेराव बिरादार सरपंच सतीश बिरादार ,उपसरपंच औदुंबर पांचाळ होनाळीकर ,ग्रामसेवक व्ही जी कैलवाडे अंगणवाडी कार्यकर्ती व ग्रामस्थ उपस्थित राहून Covid-19 चे नियमाचे पालन करत वेगवेगळ्या उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.

0 Comments