Latest News

6/recent/ticker-posts

लातुरात कोरोना पीडितांना टीम अँड. आण्णाराव पाटीलांचा गेल्या 14 दिवसापासून आधार

लातुरात कोरोना पीडितांना टीम अँड. आण्णाराव पाटीलांचा गेल्या 14 दिवसापासून आधार


बी डी उबाळे

लातूर: कोरोना पीडितांना टीम आण्णाराव पाटील यांच्याकडून मसाला राईसचे मोफत वाटप कोरोना महामारीमध्ये अनेक नागरिकांचे सध्या एक वेळ अन्न खाण्याचे वांदे झाले असून महाराष्ट्रामध्ये सतत वाढते "तारीख पे तारीख" असे लॉकडाऊन यामुळे स्वाभिमानी माणसांची ही दुनिया नाही काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. यामुळे जीवन जगण्याचा प्रश्‍न प्रत्येक सर्वसामान्य भारतीया पुढे पडला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना एक वेळचे अन्न न देण्याचे काम  लातूरमध्ये अँड आण्णाराव पाटील याच्या माध्यमातून सुरू आहे. कोरोना काळात मोठ्या संख्येने लातूर शहरात विविध रूग्णालयातून कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. याच दरम्यान रूग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही येत आहेत. बंदच्या काळात रूग्णांच्या नातेवाईकांच्या भोजनाची गैरसोय होत आहे हे लक्षात घेवून अॅड.आण्णाराव पाटील यांच्या आदेशानुसार टीम "अण्णाराव पाटील" यांच्याकडू बुधवार दि 5 मे 2021 पासून नियमीतपणे स्वादिष्ट असा मसाला व्हेज राईसचे वाटप गेल्या चौदा दिवस झाले टीम आण्णाराव पाटील यांनी लातूरमधील जनतेचे आवडीचे खाद्य मसाला व्हेज राईस कोरोना पेशंट व त्यांचे नातेवाईक यांना नियमितपणे वाटप करत आहे. सदरचे अन्न वाटपाचे कार्य टीम महा-राष्ट्र विकास आघाडी युवा कार्यकर्ते इतर मित्रवृंद आदि मार्फत लातूर अतिदक्षता दवाखाना, सह्याद्री सुपेरस्पेसिएलिटी हॉस्पिटल,लातूर, पुरनमल लाहोटी तंत्रनिकेतन कोविड सेंटर, सिद्धेश्वर मंदिर कोविड सेंटर इत्यादी ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. महा-राष्ट्र विकास युवा आघाडीचे पदाधिकारी अँड.महादेव माडजे, विजय खुपासे-पाटील, जब्बार तांबोळी व इतर कार्यकर्ते नियमीतपणे ही सेवा देत असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments