Latest News

6/recent/ticker-posts

खा.सुधाकर शृंगारे यांची चाकूर कोरोना सेंटरला भेट

खा.सुधाकर शृंगारे यांची चाकूर कोरोना सेंटरला भेट


नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) चाकूर येथील ग्रामीण रुग्णालय व कोव्हिड केअर सेंटरला भेट देऊन कोव्हिड सेंटरची पाहणी करून आरोग्य विषयक सुविधांचा आढावा घेतला. कोरोना रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून चाकूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईक विचारपूस खा.सुधाकर शृंगारे यांनी केली.यावेळी आरोग्य विभागाकडून कोविड रुग्णांच्या उपचारासंदर्भात माहिती देण्यात आली तर तेथील आवश्यक आरोग्यविषयक यंत्र सामुग्रीची मागणी केली असता तात्काळ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळवून कोविड रुग्णांच्या उपचाराकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची सूचना दिली. यावेळी समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे,सिद्धेश्वर पवार,तहसीलदार शिवानंद बिडवे,गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंडगे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक लांडे,मुख्यधिकारी अजिंक्य रणदिवे,पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, हर्षवर्धन कसबे,नितीन रेड्डी,अनिल चव्हाण व आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments