परिविक्षादिन सनदी अधिकारी जिथिन रहेमान लातूर येथे रूजू
लातूर:(जिमाका)दि. 17 - लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात परिविक्षादिन सनदी अधिकारी जिथिन रहेमान ॲटचमेंटसाठी रुजू झालेले आहेत. जिथिन रहेमान हे पुढील 11 महिने लातूर जिल्हयात कार्यरत राहणार आहेत. या काळात महसूल प्रशासन व त्यातील विविध विभाग/शाखा यांची माहिती ते घेतील. त्याचप्रमाणे जिल्हयातील इतर विविध महत्वांच्या विभागाची व तेथील कामकाजाची माहिती पहिले 6 महिने घेणार असून त्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, बीडीओ आदि पदभार दिले जातील. जिथिन रहेमान हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन 2020 च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी असून त्यांचा रँक 176 होता. रहेमान हे मूळचे केरळ राज्यातील मलापुरम येथील रहिवाशी आहेत. ते मेकॅनिक इंजिनिअरिंग मध्ये बी.टेक झालेले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रोबोशनरी I.AS. जिथिन रहेमान यांचे स्वागत केले. व त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांची माहिती करुन दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री गणेश महाडिक, जीवन देसाई, शोभा जाधव, सुचिता शिंदे, सदाशिव पडदुणे, सहाय्य्क पुरवठा अधिकारी महेश सावंत, तहसिलदार परंडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रोहन जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एस.दुशिंग उपस्थित होते.

0 Comments