आधार प्रतिष्ठानचा मानवतावादी उपक्रम
दात्याकडून स्वीकारले जाईल आणि गरजूना दिले जाईल
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा गाव येथील आधार प्रतिष्ठानने covid-19 या महामारीच्या काळामध्ये अनेक नागरिक बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही वेळ मानवी जीवनातील अत्यंत वाईट असल्याने हजारो कुटुंब उपासमारीत जीवन जगत आहेत,त्या कुटुंबाला जीवन जगण्यासाठी लागणारे दैनंदिन अन्नधान्य देण्यासाठी अन्नधान्य देण्यासाठी मानवतावादी असा एक उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाद्वारे जे आपल्या परिसरामध्ये दानशूर नागरिक नागरिक आहेत त्याच्याकडून अन्नधान्य स्विकारले जाईल आणि गरजू नागरिक जगले पाहिजे अशी मानवतावादी शिकवणीनुसार गरजुना नागरिकांना हे अन्न पुरविले जात आहे.देणाऱ्या दानशुराकडून दैनंदिन जीवनात लागणारे गहू, तांदूळ, ज्वारी, कांदा, बटाटा, तेल, मीठ, मिरची आणि इतर जीवनावश्यक साहित्य अन्नधान्य स्वीकारले जाते आणि गरजू नागरिकांना ज्यांना आवश्यक आहे अशांना किट बनवून पोहचविण्याचे काम आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.ज्यांना या मानवतावादी सामाजिक कार्यात आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही स्वरूपात जसे पैसे किंवा वस्तू स्वरूपात मदत करू शकता त्यासाठी आमची साईट पण लवकर सुरु होत आहे तत्पूर्वी मोबाईलवर आधार प्रतिष्ठानशी संपर्क साधावा हे मानवतावादी कार्य पूर्ण करण्यासाठी या आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर आर पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव रियाज खोजे, तर सोबत आधार बचत गटाचे अध्यक्ष बी डी उबाळे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव लखन लतूरे सह दीपक मानधने,पांडुरंग बनसोडे, मनोज उबाळे, शमशोद्दीन खोजे आदी सर्व हे कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

0 Comments