ए डी एम ऍग्रोने लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला दिले 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर
सतीश तांदळे
लातूर: लातूरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या मराठवाड्यातील अग्रेसर तेल उत्पादक कंपनी एडीएम ऍग्रो इंडस्ट्रीज अँड वायझॅग कं लिमिटेडच्या वतीने लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या आणि उपचारासाठी लागणारा ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता आपली सामाजिक बांधिलकी समजून एडीएम ऍग्रो इंडस्ट्रीज प्रशासनाने शासकीय वैद्यकीय रुग्णालयास 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्याचे ठरवले. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे हे ऑक्सिजन मशीन आज सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी एडीएम ऍग्रोचे व्यवस्थापक देबाकांता दास यांच्यासह मनोज शिंदे, अनिल मिठागरे तर शासकीय रुग्णालयातील डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. महादेव बनसोडे, डॉ. अजय कुदळे आदी उपस्थित होते.

0 Comments