Latest News

6/recent/ticker-posts

निटुर प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य नियोजन लावून अधीकाधिक लसीकरण

निटुर प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य नियोजन लावून अधीकाधिक लसीकरण


निटुर:(प्रतिनिधी) लसीकरणाला सुरूवात झाली त्या दिवसापासून मागील काही दिवसापूर्वी निटूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणामध्ये जिल्ह्यात अव्वल आले आहे शेहचाळीस प्रा.आरोग्य केंद्र व आकरा उपजिल्हा रूग्नालयामध्ये सरस कामगीरी करत सहा हजार नागरीकांना लस देवून जिल्ह्यात पहील्या क्रमांकावर आहे. सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे त्यातच लसीकरणाचा वेग ही आरोग्य विभाग वाढवत आहे मात्र लसीच्या कमतरतेमुळे लसीकरणाला खीळ बसत आहे. परंतू अशा ही परस्थितीमध्ये योग्य नियोजन लावून अधीकाधिक लसीकरण करून जिल्ह्यात पहीला येण्याचा मान निटूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने पटकावला असून याचे श्रेय डाॕ. श्रीनिवास मोरे व त्यांची डाॕ. पत्नी यांना जाते. सध्या शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे त्यामुळे भीती चे वातावरण आहे मात्र याही परस्थितीमध्ये निटूरचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॕ. मोरे व त्यांच्या पत्नी अत्यंत नियोजन पूर्वक कोरोना रूग्नांवर उपचार करात आहेत.सकाळी आलेल्या रूग्नांची कोविड तपासनी तसेच कांही वेळ इतर आजार घेवून आलेल्या रूग्नासाठी वेळ व त्यानंतर लसीकरण असा दिनक्रम डाॕ. मोरे यांनी केल्याने शिस्त बद्ध पद्धतीने लसीकरण होत आहे. निटूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाच उपकेंद्र आहेत तसेच सतरा ग्रामपंचायती अंतर्गत बत्तीस गावे या आरोग्य केंद्राअंतर्गत येतात तरीही लसीकराणामध्ये ते लातूर जिल्ह्यात पहील्या नंबरवर आहेत.लातूर जिल्ह्यात एकूण शेहचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तर आकरा उपजिल्हा रुग्णालय आहेत त्यामध्ये सरस कामगीरी करत निटूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने सहा हजार नागरीकांना कोरोना प्रतिबंधीत लस टोचली आहे त्यामुळे लसीकरण सुरू झाल्यापासून सर्वात जास्त लस देण्याचा उपक्रम निटूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने केल्याने समाधान व्यक्त होत आहे. निटूरच्या प्रा. आरोग्य केंद्रामध्ये मोरे दांपत्य डाॕ. आहेत ते कोरोनाच्या या कठीण काळामध्ये समर्पन भावनेने कार्य करत असल्याने ते खरे कोरोना योद्धे असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments