Latest News

6/recent/ticker-posts

"गोश बर आवाज" या उर्दू कवींच्या आंतरराष्ट्रीय निर्देशिकेत मुहम्मद मुस्लिम कबीर रोशन यांची गणना

"गोश बर आवाज"  या उर्दू कवींच्या आंतरराष्ट्रीय निर्देशिकेत मुहम्मद मुस्लिम कबीर रोशन यांची गणना


बी डी उबाळे

औसा: प्रख्यात कवी श्री मुश्ताक दरभंगवी यांच्या संपादनाखाली प्रकाशित झालेल्या उर्दू कवींची आंतरराष्ट्रीय निर्देशिका "गोश बर आवाज" मध्ये पत्रकार,कवी आणि  स्तंभलेखक, मुहम्मद मुस्लिम कबीर रोशन औसवी, यानां स्थान देण्यात आला आहे. "गोश बार आवाज " या निर्देशिकेत उपमहाद्विप खंडातील उर्दू कवींचा समावेश करण्यात आला आहे. पत्रकार मुहम्मद मुस्लिम कबीर हे भारतातील बर्‍याच उर्दू वर्तमानपत्रांचे प्रतिनिधित्व करतात आणि ते स्थानिक हिंदी वृत्तपत्र लातूर रिपोर्टरचे उपसंपादकही आहेत.  आणि या वर्तमानपत्रात ते चालू घडामोडींवर आधारित एक नियमित स्तंभ "कबीर बाणी" लिहित आहेत.  ते मराठी वर्तमानपत्रांतही लिहितात. त्याना कविता लेखणांची ही आवड आहे आणि कवितेच्या सर्व शैलींमध्ये लीहण्यांचा त्याचा प्रयत्न दिसतो.  त्यांची कविता सामाजिक जीवन आणि चालू घडामोडी प्रतिबिंबित करते. लातूर जिल्ह्यात उर्दूच्या अस्तित्वासाठी काम करणारे मोहम्मद मुस्लिम कबीर हे लातूर जिल्हा उर्दू साहित्य परिषद आणि जिल्हा उर्दू मीडियाचे अध्यक्ष आहेत.

Post a Comment

0 Comments