Latest News

6/recent/ticker-posts

मुस्लिम बांधवानी रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करावी-करीम गुळवे,माजी सभापती प.स.तथा संगायो अध्यक्ष यांचे आहवान

मुस्लिम बांधवानी रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करावी-करीम गुळवे,माजी सभापती प.स.तथा संगायो अध्यक्ष यांचे आहवान


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) गेल्या दिड वर्षापासून आपल्या देशासह जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेला असुन आत्तापर्यत लाखो लोकांनी या महामारीत आपले जीव गमावले आहेत.त्यामुळे मुस्लीम बांधवांनी अत्यंत साधेपणाने रमजान ईद साजरी करण्याचे आहवान केले आहे.कोरोनाच्या पाश्वभुमीवर सुरुवाती पासुन लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे सर्व व्यापार ठप्प आहेत.मजुरांच्या हाताला काम नाही. गरिबांचे जेवणासाठी हाल होत आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम बांधव नेहमीच लोकांच्या कामी येण्याची व सहकार्य करण्याची परंपरा अबाधित ठेवली आहे.यावर्षी रमजान ईद १३ किंवा १४ मे रोजी आपल्या देशात साजरी होणार आहे.राज्यभरात राज्य शासनाने कडक निर्बंध लावलेले आहेत.तसेच लातुर जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.सर्व दुकाने बाजारपेठ बंद असुन प्रशासनामार्फत लोकांना घरी राहण्याविषयी व कोरोना विषाणूवर नियंत्रण करण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या विविध आदेशांची अंमलबजावणी करण्याविषयी सुचना देण्यात येत आहेत.त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवानी गेल्या वर्षी सारखी यावर्षी सुध्दा रमजान ईद आपल्या घरीच राहुन अत्यंत साधेपणाने साजरी करावी.व रमजान ईदची नमाज आपल्या घरीच अदा करावी.लॉकडाऊनमुळे गोर-गरिब लोकांचे अत्यंत हाल होत असुन या लोकांना मदत करावी.त्यांचे व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत करावी.तसेच कोणीही कोणत्याही धर्माचा समाजाचा एकही माणुस उपाशी राहु नये यासाठी सर्वानी गोरगरिब लोकांमध्ये किराणा वस्तु जीवनावश्यक वस्तू वाटप करावे.अशा परिस्थितीत सुध्दा सर्वाची ईद गोड करण्याचे प्रयत्न करावे.असे आवाहन करीम गुळवे माजी सभापती प.स.चाकुर तथा संगायो अध्यक्ष चाकुर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments