Latest News

6/recent/ticker-posts

देवणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे यांचा कडक पहारा

देवणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे यांचा कडक पहारा


देवणी:(शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) देवणी शहर व तालुक्यात कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी,पंचायत समीती विभाग,नगर पंचायत विभाग,पोलीस प्रशासन,व महसुल प्रशासन, यांना तहसीलदार घोळवे यांनी सोबत घेऊन शहर व तालुक्यात कडक पहारा देत असल्यामुळे देवणी तालुक्यात कोरोणाची टक्केवारी कमी होण्यास मदत मिळत आहे. शहर व तालुक्यातील नागरिक या कडक निर्बंधाला पाहून अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडत आहेत अन्यथा घरी नाहीतर शेताकडे जाऊन अराम करत असल्याचे दिसुण येत आहे. कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेश घोळवे दिवसभर दररोज न चुकता वरील सर्व विभागाच्या यंञणेला सोबत घेऊन शहर व देवणी तालुक्यातील ग्रामीण भागात कडक पहारा देत असल्याने कोरोना प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात कमी झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments