Latest News

6/recent/ticker-posts

"पहले कोरोना से निपट लेंगे, फिर ईद की खुशीयॉं मनायेंगे !'

"पहले कोरोना से निपट लेंगे, फिर ईद की खुशीयॉं मनायेंगे !'


प्रशांत तांबोळकर

शिरूरअनंतपाळ: सलग दुसऱ्या वर्षी रमजान ईदवर कोरोनाचे सावट आहे. मुस्लिम समाजात धार्मिक दृष्ट्या रमजान महिना व ईदचे अनन्य साधारण महत्व आहे. परंतु कोरोनामुळे दुसर्‍यावर्षीही रमजान ईदवर कोरोनाचे सावट असल्याने ईद घरीच साजरी करण्याचे आवाहान मुस्लिम एकता फाऊंडेशनचे शिरूरअनंतपाळ तालुका प्रमुख अब्दुल अजीज मुल्ला यांनी केले आहे. पहले कोरोनासे निपट लेंगे, फिर ईद की खुशीया मनायेंगे. असा निर्धार करीतच मुस्लिम बांधवाकडून यंदा रमजान ईद  अत्यंत साध्या पद्धतीने साजरी होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सलग दुसऱ्या वर्षी रमजान ईदवर कोरोनाचे सावट आहे. मुस्लिम समाजात धार्मिक दृष्ट्या रमजान महिना व ईदचे अनन्य साधारण महत्व आहे. संपूर्ण महिनाभर रोजा ( उपवास ) तरावीह, नमाज, कुराण पठण करीत ईश्वराची इबादत (सेवा ) केली जाते. ईदच्या माध्यमातून या महिन्याची सांगता होते. त्यामुळे रमजान ईद म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते. परंतु मागील वर्षभरापासून कोरोनामुळे संपूर्ण जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीने मानवी जीवनच विस्कळीत केले आहे. सर्वधर्मीय सण, उत्सव यावर मोठा परिणाम झाला आहे. मागील वर्षापेक्षाही यंदाची परिस्थिती अतिशय विदारक आहे. कोरोनामुळे अनेक कुटूंबियांसह मित्र परिवारावर ओढावलेले दुःखद प्रसंग, वाढत्या महागाईबरोबरच निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न व कोरोनाची सद्यस्थिती या बाबींचा विचार करता शुक्रवारी ईद आली असून समाज बांधवांत कसलाही उत्साह दिसून येत नाही. त्यामुळे बाजारपेठेत ना नव्या वस्तुची खरेदी, ना नव्या कपड्यांची खरेदी, ना किराणा बाजाराची लगबग सर्व काही शांत, असेच वातावरण विशेषतः ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.ईद तो हर साल आनेवाली है, पर जिंदा रहेंगे तो ही ईद मनायेंगे ना, इसलिये पहले कोरोना से निपट लेंगे और फिर ईद की खुशीया मनायेंगे, असा आशावाद ठेवूनच अत्यंत साध्या पद्धतीने ईद साजरी करणार असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.


दरम्यान समाजातील काही दानशूर व सामाजिक भान ठेवणाऱ्याकडून सर्वच जाती धर्मातील वृद्ध, गरिब, निराधार, बेरोजगार कुटूंबियांना अन्नधान्यासह, रोख रकमेची शक्य तेवढी मदत दिली जात असून सध्या अनेकांपुढे रोजी रोटीचा प्रश्न गंभीर आहे, अशा गरजूंना आणखी मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तीनी हातभार लावण्याबरोबरच कोरोंनाग्रस्त व्यक्ती व कुटूंबियांना मानसिक आधार देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया येरोळ येथील मौलाना मेनौद्दीन मुजेवार , पञकार के. वाय , पटवेकर ,  जहरुद्दीन शेख , आदी समाज बांधवांनी भावन्या व्यक्त केल्या. दरम्यान चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी होणारी ईदची नमाज प्रशासनाच्या नियमाचे पालन  प्रत्येकांनी घरीच अदा करावी, असे आवाहन ही गावोगावच्या समाज प्रमुखासह अब्दुल अजीज मुल्ला यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments