Latest News

6/recent/ticker-posts

Covid-19 च्या नियमाचे पालन करुन ईद साजरी करा-पो.नि.परमेश्वर कदम

Covid-19 च्या नियमाचे पालन करुन ईद साजरी करा-पो.नि.परमेश्वर कदम


शिरुर आनंतपाळ
:( प्रशांत तांबोळकर ) कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे मुस्लिम बांधवानी प्रशासनाच्या नियमाचे पालन करून रमजान ईद घरीच साधेपणाने साजरी करा असे आवाहान शिरूरअनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी केले आहे. Covid-19 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईद उल फित्र हा सण आपआपल्या घरातच साजरा करावा. या सणाच्या निमित्ताने ईद ची सामूहिक नमाज पठण साठी कोणीही मस्जिदमध्ये, सार्वजनिक ठिकाणी अथवा ईदगाह मैदानावर एकत्रीत येऊ नये, रमजान ईद हा पवित्र सण शुक्रवारी साजरा केला होणार आहे. या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अथवा मस्जिदमध्ये एकत्र येऊ नये. जिल्हाभरात कोरोना विषाणू संसर्ग वाढला आहे. तो टाळण्यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने ही आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये संचारबंदी आहे. प्रत्येकांनी नियमांचे पालन करावे व हा सण घरातच साजरा करावा. हा उत्सव साजरा केला जात असताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे यावर भर द्यावा. तसेच सर्वांनी आपले कुटुंब आपली जबाबदारी चे पालन करावे. तसेच समाजातील धर्मगुरू, प्रमुख कार्यकर्ते , नेते, सामाजीक कार्यकर्ते यांनी हा सण साधेपणाने साजरा करण्या संदर्भात जनजागृती करावे. त्याचप्रमाणे शरण क्रांतीचे जनक, महामानव  महात्मा बसवेश्वर यांचीही जयंती उत्साहात परंतु साधेपणाने सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता घरीच आपआपल्या घरीच साजरी करुन प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन परमेश्वर कदम यांनी तालुक्यातील नागरिकाना केले आहे.

Post a Comment

0 Comments