Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा पोलीस स्टेशन तर्फे ईद च्या शुभेच्छा व नागरिकांना आवाहन

निलंगा पोलीस स्टेशन तर्फे ईद च्या शुभेच्छा व नागरिकांना आवाहन


निलंगा :(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना निलंगा पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात आले आहे की कोवीड विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईद हा सण आपआपल्या घरातच साजरा करावा. या सणाच्या निमित्ताने ईद ची सामूहिक नमाज पठण साठी कोणीही मस्जिदमध्ये, सार्वजनिक ठिकाणी अथवा ईदगाह येथे एकत्रीत येऊ नये,रमजान ईद हा पवित्र सण उद्या साजरा केला जाणार आहे.या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अथवा मस्जिदमध्ये एकत्र येऊ नये. जिल्हाभरात कोरोना विषाणू संसर्ग वाढला आहे.तो टाळण्यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीनेही आदेश जारी करण्यात आले आहेत.जिल्ह्यामध्ये संचारबंदी आदेश लागू आहेत. प्रत्येकांनी स्वतःचे सुरक्षेसाठी नियमांचे पालन करावे व हा सण घरातच साजरा करावा. हा उत्सव साजरा केला जात असताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे,तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे यावर भर द्यावा. तसेच सर्वांनी आपले कुटुंब आपली जबाबदारी चे पालन करावे.तसेच समाजातील धर्मगुरू,प्रमुख कार्यकर्ते , नेते, सामाजीक कार्यकर्ते यांनी हा सण साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करावे. असे आवाहन निलंगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments