कोकळगाव मध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांना केले युवकांनी अभिवादन
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) साडे तीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीय एक दिवस शुभ याचे औचित्य साधून निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील तरुणांनी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसवेश्वर महाराजांना अभिवादन केले.यावेळी काही तरुणांनी संकल्पही केले.महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार गावातील तरुणांपर्यंत पोंहचवणार, तरुणांना व्यसनापासून दूर ठेवणार,साधी राहणी उच्च विचार श्रेणीचा वापर करणार,उद्योग व्यवसायाकडे तरुणांनी वळावे,यासाठी आम्ही प्रयत्न करणार, कोविड काळात सामाजिक सेवेचे माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे करण्याचा संकल्प यावेळी काही तरुणांनी केलेला आहे. यावेळी नितीन आगलावे, बद्रिनाथ आगलावे, विशाल वांजरवाडे, शंकर लामतुरे ,दयानंद पाटील ,नवनाथ आगलावे ,संतोष लामतुरे, ओमकार लामतुरे ,सोमनाथ लामतुरे, स्वप्नील लामतुरे, शामराव मंगणे ,सिद्धेश्वर लामतुरे, आदींची उपस्थिती होती.यावेळी सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात आले.
0 Comments