नळेगाव येथे छत्रपती संभाजी महाराज,जगतज्योति बसवेश्वर महाराज व भगवान परशुराम जयंती उत्साहात
नळेगाव:(प्रतिनिधी बाळासाहेब बरचे) छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व जगतज्योति बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी चौक येथे चाकूर तालुका संभाजी सेनेच्या वतीने ध्वजारोहण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी उपसरपंच तथा ग्रा.पं सदस्य सूर्यकांत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण, ग्रा.पं. सदस्य, श्याम मुंजाने, दगडू सावळकर, ज्ञानेश्वर गाडेकर, माजी उपसरपंच घ्रष्णेश्वर मलशेट्टे, अण्णाराव सोनटके, गौरव पट्टणशेट्टी, सतिश शृंगारे, बाळू बनसोडे, संतोष तेलंगे, राजेंद्र शेलार, गणेश धविले, सुनील चव्हाण, कैलास सूर्यवंशी, जगदीश नळेगावकर अमोल सोमवंशी,दत्ता शिंधळकर,आदी उपस्थित होते तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अनिल चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने श्री अष्टविनायक मेडिकल समोर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर चा वापर करत सुरक्षित अंतर ठेवून संभाजी महाराज व बसवेश्वर महाराज व तसेच भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनिल चव्हाण ,माजी उपसरपंच मलशेट्टे, ग्रा.प सदस्य उमाकांत सावंत,श्याम मुंजाने, दगडू सावळकर, ज्ञानेश्वर गाडेकर, चव्हाण, सत्यवान सावंत, गौरव पट्टणशेट्टी, अतुल मुंजाने, कैलास चव्हाण,संतोश तेलंगे,राजेंद्र शेलार, जाधव,धोंडीराम स्वामी, माधव मुगे, प्रशांत फरकांडे, मनोज धविले, सोमनाथ वाघमारे, महेश सोमवंशी आदी उपस्थित होते.

0 Comments